नांदेड। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिनाचे (२८ डिसेंबर) औचित्य साधून स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान या विषयावर खुली वक्तृत्व स्पर्धा रविवार (ता.१५जानेवारी) रोजी येथील आयटीएम सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान अन्य एका कार्यक्रमात नांदेड काँग्रेस – ७० वर्षाचा गौरवशाली प्रवास (१९५१ ते २०२१) या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३७ वा स्थापना दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या कार्याला उजाळा देण्याच्या हेतूने, स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत काँग्रेसचे योगदान या विषयावर खुली वक्तृत्व स्पर्धा रविवार (ता.१५ जानेवारी) रोजी आयटीएम सभागृह येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यावेळी स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर माजी मंत्री डी.पी. सावंत हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.
आ. मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी इतर मान्यवरांची देखील उपस्थिती असणार आहे. दरम्यान अन्य एका कार्यक्रमात बापूसाहेब पाटील लिखित, नांदेड काँग्रेस – ७० वर्षाचा गौरवशाली प्रवास (१९५१ ते २०२१) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०७ हजार रोख, सुमृतिचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास ०५ हजार रोख, सुमृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व तृतीय क्रमांकास ०३ हजार रोख, सुमृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा १५ वर्षांपासून पुढील वयोगटातील सर्वांसाठी खुली असणार आहे. सहभाग नोंदणी प्रक्रिया दि. ०३ जानेवारी पासून सुरु होणार आहे. अशी माहिती आयोजक तथा नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील यांनी दिली आहे.