नांदेड। या कार्यालयाने आज सकाळी दिलेल्या प्रेस नोट क्रमांक 343 मध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी सूचित केल्या नुसार ओखा –रामेश्वर-ओखा एक्स्प्रेस मनमाड-रामेश्वरम दरम्यान रद्द न करता या गाडीला मंडपम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द येत आहे. हि गाडी दिलेल्या दिनांकास ओखा ते मंडपम आणि मंडपम ते ओखा दरम्यान धावेल. ती पुढील प्रमाणे –
- दिनांक 27 डिसेंबर,2022 ला ओखा येथून सुटलेली गाडी संख्या 16734 ओखा –रामेश्वरम एक्स्प्रेस मंडपम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी ओखा ते मंडपम अशी धावेल.
- दिनांक 30 डिसेंबर,2022 ला रामेश्वरम येथून सुटणारी गाडी संख्या 16733 रामेश्वरम – ओखा एक्स्प्रेस रामेश्वरम ते मंडपम दरम्यान रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी मंडपम ते ओखा अशी धावेल.