Monday, February 6, 2023
Home Uncategorized जिल्ह्यातील कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम; गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित -NNL

जिल्ह्यातील कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम; गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे अधिक सुरक्षित -NNL

कोरोनाच्या आव्हानाला पेलण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी

by nandednewslive
0 comment

नांदेड| जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे युद्धपातळीवर तयारी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नुकताच जिल्हातील आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सर्व साधन व सेवा-सुविधांची रंगीत तालीम घेऊन पूर्व तयारी केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वैद्यकियदृष्ट्या मुबलक प्रमाणात सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. मागील कोविडच्या लाटेत सर्वाधिक 35 मे. टन पर्यंत ऑक्सिजनची मागणी गेली होती. त्यावेळेसच्या मागणीच्या तीनपट पेक्षा अधिक आता जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता झाली आहे. सद्यस्थितीत 178.99 मे. टन ऑक्सिजन सुविधा आहे. यात आणखी 45.82 मे. टन ऑक्सिजन क्षमता वाढविली जात आहे. जिल्ह्यात समर्पित कोविड रुग्णालयामध्ये सुमारे 1190 खाटा अर्थात बेडस् सुविधा आहे.

मागील कोविड लाटेत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी बेडसची संख्या 4 हजारापर्यंत वाढविण्यात आली होती. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सुमारे 250 व्हेंटीलेटरची सुविधा आहे. हे सर्व यंत्रणा आज रंगीत तालमीमध्ये तपासून घेण्यात आली. भविष्यात गरज जर भासलीच तर त्यात कोणतीच त्रुटी असता कामा नये यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. टेस्टींग किटस् मुबलक प्रमाणात आहेत. मुखेड येथे उपजिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर केंद्र साकारले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 68 रुग्णवाहिका तर शासकीय रुग्णालयाकडे इतर 36 रुग्णवाहिका असा एकुण 107 रुग्णवाहिका प्रत्येक ठिकाणी तयार आहेत. याचबरोबर इतर 25 रुग्णवाहिका जिल्ह्यात तत्पर आहेत.

banner

जिल्हा प्रशासनाने कोविडच्यादृष्टिने पूर्व तयारी केलेली आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे यात वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण, मास्क यासाठी अधिक सतर्क राहून काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!