उस्माननगर। उस्माननगर येथून जवळच असलेल्या धनंज (बू.)ता.लोहा येथील उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव भूरे यांचे वडील जेष्ठ नागरिक निवृती नारायण भूरे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दिर्घ आजाराने दि.२७ डिसेंबर रोज मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटानी दुःखद निधन झाले.
दि.२८ डिसेंबर रोज बुधवार या दिवशी दुपारी २ वाजता त्यांच्या मुळगावी धनंज ( बू.)ता.लोहा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी ,सुन,नातू ,नाती असा परिवार आहे .