नायगांव, रारामप्रसाद चन्नावार। रातोळी ता.नायगांव येथे सातव्या सर्व धर्मिय अखंड शिवनाम सप्ताहाची सुरूवात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली.मन्याड नदीच्या काठावर वसलेले इच्छापूर्ती महादेव मंदिरात हा सप्ताह साजरा होणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
राष्ट्रसंत डॉ सदगुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशिर्वादाने तर ष.ब्र.ष सद्गुरू सिध्दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, ष.ब्र.ष. डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या उपस्थितीत दि.२८ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाने नामयज्ञ सोहळा संपन्न होणार आहे.दरम्यान दररोज पहाटे शिवपाठ, सकाळी सामुदायिक परमरहस्य पारायण सोहळा, प्रवचन, दुपारी गाथा भजन, सायंकाळी रिंगण शिवपाठ, रात्री दररोज शिवकीर्तन, प्रसाद व शिव जागर असे नित्य उपक्रम सुरू राहणार आहेत.
यात कीर्तन सेवा शि.भ.प.स्वातीताई दापकेकर, राजेश्वर महाराज लाळीकर, वर्षाताई कुमार स्वामी, चंद्रकांत अमलापुरे, बालाजी पाटील येरूळकर, मन्मथ डांगे गुरूजी, विकास भुरे, विश्वंभर बडुरे, शिवराज नावंदे गुरूजी यांची होणार आहे.गायणाचार्य अशोक पाटील उच्चेकर,शिवसांब महाराज, गणेश थोटे, लक्ष्मीबाई लिंबुर, कौशल्य मलकापूर, व्यंकटराव तांबोळी, राजेश्वर महाराज कोंडलवाडी यांच्या सह नंदगाव, सलगरा,कर्णा,कार्ला,रातोळी येथील महिला पुरुष भजनी मंडळी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन धोंडीबा नागठाणे गुरूजी यांनी केले आहे.