Monday, February 6, 2023
Home Uncategorized सहकारी संस्था नांदेड व सभासदांनी घेतलेला प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप हा कायदाची पायमल्ली करणारा -NNL

सहकारी संस्था नांदेड व सभासदांनी घेतलेला प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप हा कायदाची पायमल्ली करणारा -NNL

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषणाला बसणार

by nandednewslive
0 comment

नांदेड। गोदावरी हातमाग वस्त्रनिर्माण सहकारी संस्था मर्यादित वासारणी ता. जि. नांदेड हे सहकार कायदा अन्वये संस्थेच्या मतदान प्रक्रियेत मतदान करण्यास पात्र अस्तेवेळी तालुका निवडणूक अधिकारी तथा तालुका उप निबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी सदर सभासदांनी घेतलेला प्रारूप मतदार यादीवरील आक्षेप हा कायदाची पायमल्ली करून व संस्थेशी म्हणजेच संचालक मंडळाशी संगनमत करून मतदानाचा हक्क डावलून त्यांची नावे मतदार यादी समाविष्ट केलेले नाही.

तालुका निवडणूक अधिकारी तथा तालुका उप निबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी दिनांक:२३/१२/२०२२ रोजी पारीत केलेला न्याय निर्णय हा आर्थिक देवाण घेवाणीतून पारित करून संस्थेच्या सभासदांवर अन्याय केला आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा संविधाना मध्ये मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा घटनात्मक अधिकार असून त्यापासून कोणास हि वंचित ठेवता येत नाही. असे असताना तालुका निवडणूक अधिकारी तथा तालुका उप निबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी संस्थेच्या २५ मूळ सभासदांच्या विरोधात म्हणजे न्यायच्या विरोधात दिनांक: २३/१२/२०२२ रोजी आदेश पारित करून सर्व सभासदांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे.

तसेच संस्थेने आमच्या २५ २५ मूळ सभासदांना बे-बाकी प्रमाणपत्र देत नसल्या बाबत दिनांक ०२/०१/२०२३ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब बेमुदत आमरण उपोषणाला बसणार जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास दिनांक ०९/०९/२०२३ रोजी आत्मदहन करणार आहोत. या सर्व प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयाने योग्य ती चौकशी केल्यास प्रकरणातील केलेली हातमिळवणी हि लक्षात येईल असे देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे.

या निवेदनावर श्रीमती. प्रेमीला नरसय्या तुम्मा श्री. जनार्धन विठोबा गंजी, श्री. माणिक रामचंद्र पेंडकर, श्रीमती. कमळ गणेश गुंडाळे, श्री. गीताराम साठवाजी चीटकल्वार, श्री. शिवराम रामय्या मिठापेल्ली, श्री. दामाजी गंगाधर इरमलवार, श्री. लक्षमण माधवराव चालीन्द्रावर, श्रीमती. विमल अशोक गव्वल, श्री. नारायण सोमय्या चीप्पा, श्रीमती. ज्योती ब्रह्मानंद गंजी श्रीमाती. शशिकला मनोहर गुंडाळे, श्री. नरसय्या पोशेट्टी अंदे, श्रीमती शारदा गणपत चिंतेवार, श्री. कोंडीबा निवृत्ती गुंडेवार,श्री. गंगाधर हनुमंतू अंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!