
हिंगोली। राज्य सरकारी गड -ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. भाऊसाहेब पठाण यांच्यावरील भ्याड हल्याचा जाहिर तीव्र निषेध करण्यात आला असून, याबाबतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोर दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारी कर्मचारी गड -ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री.भाऊसाहेब पठाण हे दिनांक 20/12/2022 रोजी सायंकाळी 05:30 वाजता दि महाराष्ट्र मंत्रालय को. आँप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष असलेले आकाशवाणी आमदार निवास येथील मुख्यालयात कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आले असता मा. खासदार श्री. आनंदराव अडसूळ व त्यांच्या साथीदारांनी जीवघेणा भ्याड हल्ला केला.

त्याच्या निषेधार्थ संबंध राज्यभरासह राज्य कर्मचारी गड -ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा हिंगोली जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने दिनांक 27/12/2022 रोजी दुपारी ठिक 2 ते 3 या वेळेस मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून या भ्याड हल्याचा तीव्र जाहीर निषेध करण्यात आला असून, हल्लेखोर दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी विविध विभागातील कर्मचारी वर्ग व महासंघाचे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, संघटक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप भुक्तर, सचिव श्री. गजानन चव्हाण, उपाध्यक्ष श्री. नितीन पांढरे, श्री. के. डी. डोंगरे,सदाशिव सोनुने, सहसचिव श्री. प्रभाकर खिल्लारे, श्री. कैलास खंदारे, संघटक श्री. एस. व्ही. नलगे,सह संघटक श्री. हरीकिशन धनगर, प्रसिध्दी प्रमुख श्री. प्रकाश मुकाडे, श्री. गंगाधर चेपूरवार, सदाशिव काळे, रामगडे डी. एन, श्री. जी. बी. पतंगे, श्री. सुरेश डोनहाटे, मोहन बोथरा, राजेश पुंड, किशोर इठोडे, ताय्यर पठाण, मथुराबाई दिंडे, सुभद्राबाई ठोंबरे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.

