नांदेड। कर्मयोगी डॉ.नानासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १ जानेवारी २३ रोजी गांधीनगर कंधार येथे अभिष्टचिंतन सोहळा व बिड येथील सुप्रसिध्द किर्तनकार हभप राधाताई सानप यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्य ‘अभिष्टचितंन सोहळा दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोज रविवार सायंकाळी ४ वाजता मौजे गांधीनगर (दिग्रस खुर्द) ता. कंधार जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
ह.भ.प. राधाताई सानप (प्रसिध्द किर्तनकार )यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.अॅड. श्रीनिवास जाधव नगरसेवक नां. वा.श.म.न.पा.नांदेड व कार्यक्रमाचे समन्वयक बाजीराव ताटे, शिवाजी कानवटे ,सुधाकर थोटे यांनी केले आहे.