
हिमायतनगर/नांदेड। सेशन कोर्टाने हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील देवकृपा गोशाला तथा गोविज्ञान केंद्राच्या बाजुने 2 अलग अलग प्रकरणामध्ये निकाल दिला आहे. यामुळं गोसेवेचे कार्य करणाऱ्या गोभक्तामधून न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आभार मानले जाते आहे.

दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी पोलीस स्टेशन मनाठा यांनी 10 गोवंश जप्त करून आरोपीच्या विरूद्ध कारवाई करून गोवंश जप्त करून ती गोधन देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्र पवना तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे संगोपनासाठी दिले होते. हदगाव कोर्टाने सदरचे गोवंश सोडण्याचा निर्णय दिला होता. त्याविरोधात गोशाळेने शेषन कोर्ट नांदेड येथे आपील दाखल केले होते. त्याच प्रकरणात न्यायालयाने गोशाळेच्या बाजुने निकाल दिला आहे.

तसेच ईस्लापुर पोलीस स्टेशनने शिवणी येथे कारवाई करून 9 गोवंश देवकृपा गोशाळेत संगोपनासाठी दिले होते. या प्रकरणात देखील किनवट न्यायालयाने गोवंश आरोपीच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला होता. त्याही प्रकरणात गोशाळेने शेषन कोर्ट नांदेड येथे अपील दाखल केले होते, या दोन्ही प्रकणात कोर्टाने देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्राच्या बाजुने निकाल दिला आहे.

मुंबईचे ॲड श्री राजु गुप्ताजी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे ॲड जगदीश हाकेजीं, ॲड सुमीतजी तोष्णीवाल, ॲड अविनाशजी नरवाडे आणि किनवटचे ॲड पंकज गावंडेजी यांच्या मेहनतीने आणि सर्व हजारो गोरक्षक कार्यकर्त्यांना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमूळ निकाल देवकृपा गोशाळेच्या बाजूनं लागला आहे. एड हाकेजी व त्यांची टीम नियमीतपणे देवकृपा गोशाळेच्या केसेसचा पाठपुरावा करतात.

आजपर्यंत देवकृपा गोशाळेच्या माध्यमातुन नांदेड जिल्ह्यातील विविध कोर्टात 128 पिटीशन दाखल करून हजारो गोवंशास जिवनदान दिलेले आहे. मागच्या 7 वर्षांपासुन गोरक्षणाचे व गोसेवेचे कार्य शासनाच्या कोणत्याही सहकार्याशिवाय अविरतपणे चालुच आहे. गोशाळेचे संचालक किरण बिच्चेवार यांनी चाऱ्यासाठी, औषधोपचारासाठी समाजातील गोप्रेमी गोभक्तांना मदतीचे आवाहन केले आहे. आज रोजी गोशाळेत 400 च्या वर गोवंशाचे यथोचित संगोपन चालु आहे. आजपर्यंत 69 विशालकाय नंदी ( वळु ) ना जिवनदान मिळाले आहे. अशी माहिती किरण सुभाष बिच्चेवार, गोरक्षा विभाग प्रमुख नांदेड विभाग, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत तथा, संचालक, देवकृपा गोशाला तथा गोविज्ञान केंद्र, पवना तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड यांनी दिली व याकामी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहे.

