Saturday, January 28, 2023
Home नायगाव मांजरम येथे कृषी उत्पन्न बाजार च्या पेट्रोल पंपाचे गुरुवर्य यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ -NNL

मांजरम येथे कृषी उत्पन्न बाजार च्या पेट्रोल पंपाचे गुरुवर्य यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ -NNL

by nandednewslive
0 comment

नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। कृषी उत्पन्न बाजार समिती नायगांव उप बाजारपेठ मांजरम येथे सण 2021 मध्ये बाजार समितीचे तत्कालीन सभापती मा. आ. श्री वसंतराव बळवंतराव पाटील चव्हाण यांच्या अथक परिश्रमातून मांजरम येथील डिझेल व पेट्रोल पंप हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सोलापूर यांच्याकडून मंजूर करून घेऊन अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व शासकीय परवाना व बांधकाम पूर्ण करून दिनांक 29/12/2022 रोज गुरुवार दुपारी 1 वाजता नायगांव पंचक्रोशीतील कोलंबी येथील मठाधिपती गुरुवर्य श्री यदुबन महाराज कोलंबीकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला.

बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक श्री एस जी गन्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सचिव श्री एस व्ही कदम, हिंदुस्तान पेट्रोलियम चे जिल्हा व्यवस्थापक श्री शोबित सोनी व कर्मचारी एम एस कदम ,माधव कुलकर्णी ,रामदास गायकवाड ,काळेश्वर बोमनाळे, मारुती पन्नासे, शंकर पापडु, साईनाथ भालेराव, व भुजंग माऊलीकर इत्यादींच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला सदर नावीन्यपूर्ण उपक्रमांस नायगांव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री श्रीनिवास व्यंकटराव पाटील चव्हाण मांजरमच्या सरपंच सौभाग्यवती शोभाबाई निळकंठराव माली पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती मा. मोहनराव पाटील धुपेकर, माधवरावजी बेळगे ,हणमंतराव पाटील चव्हाण ,माजी संचालक परसराम पाटील कांडाळकर, संजय रेड्डी ,भगवान पाटील लंगडापुरे ,सतीश लोकमनवार ,शेषराव दासवाड ,गणपतराव पाटील गायकवाड,व मांजरम व परिसरातील ग्रामस्त राहून शुभेच्छा दिल्या आहे.

व्यापारी श्री शंकर पाटील लाब्दे बालाजी कोटुरवार भगवान पाटील ताटे मुगावकर व मांजरम येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच मांजरम जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!