नवीन नांदेड। राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यां संदर्भात लवकरच पोलीस पाटील कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस पाटील यांनी काढलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशन प्रसंगी दिली.
महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यां संदर्भात न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या ‘कृती’ समितीच्या वतीने २१ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील शिष्टमंडळाकडून पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन स्विकारून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोल्लेखित आश्वासन दिले, अशी माहिती राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पाटील,उपाध्यक्ष तथा ‘राज्यपाल’ पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल पाटील यांनी दिली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान, नांदेडचे आ. मोहनराव हंबर्डे व हदगावचे आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. बालाजीराव कल्याणकर,व जिल्हायातील आमदार यांच्यासह महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांच्या असंख्य आमदारांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती दिली. नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चात राज्यातील तब्बल १५ ते १६ हजार पोलीस पाटलांची उपस्थिती होती,ग्राम पोलीस पाटील अधिनियम १९६७ दुरुस्ती करणे बाबत,किमान वेतन कायदा नुसार आधारभुत मानधनात मिळावे, आर्थिक विकास महामंडळ स्थापना करावी, राज्यातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्यात यावी यासह अकरा मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन लक्ष वेधण्यात आले.
विशेष महत्वाची बाब म्हणजे, महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात १० जानेवारी रोजी ‘कृती’ समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .