
उस्माननगर। शिक्षकांनी विद्यार्थ्येचे अध्यापन स्तर करून गुणवत्ता पूर्ण करावे असे प्रतिपादन कंधार पं.स.गटशिक्षणधिकरी बालाजी शिंदे यांनी केले. उस्माननगर येथील सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत बीट स्तरीय शिक्षण परिषेदचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कीं, विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी कार्य तत्पर राहून विद्यार्थ्यांचा बौद्धिक कौशल्यासह सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागांच्या विद्यार्थ्यां बरोबरीने उभे करण्याची ताकद विद्यार्थ्यामध्ये गुरुजनांनी उभी करावी व विद्यार्थ्यांना एक सक्ष्म भारतीय नागरिक बनवावे असे शिक्षकांना संबोधित करताना व्यक्त केले .

अत्यंत सरळ आणि सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना कसे शिकवावे अनेक पैलू त्यांच्या खास शैलीतून शिक्षकांना मार्गदर्शन केले. अत्यंत सोपे आणि सरळ भाषेमध्ये विद्यार्थ्यांना आपलंसं करण्यात शिक्षकांना कोणते पैलू आत्मसात करणे अपेक्षित आहेत जेणेकरून विद्यार्थी हा सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिक्षण घेईल .

शिक्षण म्हणजे वाचन लेखन नव्हे तर विद्यार्थी हा शाळेशी जोडला पाहिजे नकारात्मक दृष्टी जर शिक्षकांनी आत्मसात केली तर विद्यार्थी हा घडत नाही . स्वतः शिक्षकांनी सकारात्मक बाबीकडे लक्ष देणे अपेक्षित आहे जेणेकरून विद्यार्थी घडला पाहिजे अनेक पैलूतून शिक्षकांना ज्ञान रस दिला.शिक्षण परिषदेच्या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी चेअध्यक्ष देवरावजी सोनसळे हे होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी शिंदे गटशिक्षण अधिकारी कंधार , विस्तार अधिकारी वसंत मेटकर, केंद्रप्रमुख जयवंत काळे, मुख्याध्यापक राहुल सोनसळे, आधी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन पाहुण्याचे स्वागत केले .तर शाळेच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या शिक्षण परिषदेला उस्मान नगर बीट अंतर्गत शाळेतील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन लाटकर यांनी केले तर आभार देविदास डांगे यांनी मानले शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मन्मथ केसे, भगवान राक्षसमारे ,शकील शेख ,समता जोंधळे, मनीषा भालेराव, रोहीनी सोनकांबळे, सौ. मिराबाई भिसे, आदींनी परिश्रम घेतले.

