माहूर, राज ठाकूर। आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित वानोळा अंतर्गत नऊ गावाचा समाविष्ट असलेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बुधवारी माहूर तालुका उपनिबंधक सहकारी संस्थाच्या कार्यालयात संपन्न होऊन चेअरमन पदी माधव शेळके व व्हाईस चेअरमन पदी दत्तराव मोहिते यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दि. 28 डिसेंबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वानोळा या सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणूक निर्वाचन अधिकारी सौ. वैशालीताई नगराळे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव डी. एम. गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन चेअरमन पदी माधव शेळके तर व्हाईस चेअरमन पदी दत्तराव मोहिते यांची संचालकातून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक ज्योतिराम राठोड, बाबाराव तोडसाम, तारासिंग चव्हाण ,गौतम महामुने, वसंत कुडुमते ,वल्लभदास पवार ,तुकाराम मडावी ,यादव तिळेवाड, श्रीमती सुगंधाबाई मडावी ,पुंजीबाई कुडमते, यांची उपस्थिती होती. सदर संस्थेत वानोळा, पानोळा ,पाचुंदा, मेंडकी ,मुंगशी, रामपूर, अजनी ,से.फ. वझरा, व मांडवा या गावाचा समावेश आहे.