Thursday, February 2, 2023
Home किनवट आदिवासी समाजाला शबरीमाता योजनेतून घत्रकुल द्या – आमदार भीमराव केराम यांची विधानसभेत मागणी -NNL

आदिवासी समाजाला शबरीमाता योजनेतून घत्रकुल द्या – आमदार भीमराव केराम यांची विधानसभेत मागणी -NNL

by nandednewslive
0 comment

किनवट, माधव सूर्यवंशी। किनवट माहूर तालूका हा आदिवासी व डोंगराळ भाग असून या दोन्ही तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे परंतू आजपर्यंत अनेक आदिवासी कुटुंब शबरी माता योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलाच्या लाभापासून वंचित आहे.

दोन्ही तालुक्यातील गोरगरीब आदिवासी कुटुंब उघड्यावर वास्तव्य करीत आहे ही बाब लक्षात घेऊन नागपूर येथे पार पडलेल्या अधिवेशन काळात विधानसभेत माझ्या किनवट माहूर मतदार संघातील आदिवासी कुटुंबांना शबरीमाता घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे. अशी मागणी केली असता याबाबत आजपर्यंत 85हजार लाभार्यांना शबरी माता योजनेतून घरकुल देण्यात आले असून ज्यांनी घरकुलासाठी प्रस्ताव दाखल केले अशा सर्वांना घरकुल देण्यात यावे यासाठी सर्वच आदिवासी प्रकल्प अधिकार्‍यांना आदेशीत केले असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

आमदार भीमराव केराम यांनी शबरीमाता योजनेतून आदिवासी समाजाला घरकुल मिळवुन देण्याची मागणी केली व त्यांच्या मागणीला यशही आलेअसुन किनवट माहूर मतदारसंघातील जनतेने त्यांना धन्यवाद देउन आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!