Saturday, January 28, 2023
Home Uncategorized ओंकारेश्वरनगर तरोड खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

ओंकारेश्वरनगर तरोड खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

by nandednewslive
0 comment
नांदेड| तरोडा खुर्द भागातील ओंकारेश्वर नगर येथे ह.भ.प बालाजी महाराज पांचाळ, ह.भ. प. पांडुरंग महाराज पांचाळ पासदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25 डिसेंबर रोज रविवारपासून टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. 
सतत सात दिवस चालणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताह शिवलीलामृत पारायण, काकड आरती, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ व हरि कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम पार पडत आहे. गेल्या चार दिवसात ह.भ.प. बालाजी महाराज पांचाळ, तुकाराम महाराज चाटोरीकर, आत्माराम महाराज रायवाडीकर, गंगाधर महाराज एकलरा यांचे कीर्तन झाले. 
1 जानेवारी 2023 रोजी काल्याच्या कीर्तनाने आयोजित सप्ताहाचे समारोप होणार आहे. दरम्यान ह.भ.प. सदानंद महाराज रायवाडीकर लोहा, ह.भ.प.वारकरी भूषण ज्ञानोबा माऊली महाराज सिंदगीकर व शेवटचे काल्याचे किर्तन हे.भ.प.निळोबा महाराज हरबळकर यांचे किर्तन होणार आहे.
आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात गजानन काळे हे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी रामदास पांचाळ, व्यंकट पाटील शिरूर, केशव महाराज वानखेडे, हनुमंत पांचाळ, राम महाराज सुगावकर, मोतीराम बनवास, नामदेव शिलगुंडे, सुदाम चाटोरीकर, विठ्ठल पाटील यांच्यासह ओंकारेश्वर नगरातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!