Sunday, January 29, 2023
Home नायगाव नायगांव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करा—– युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांची मागणी -NNL

नायगांव तालुक्यातील मौजे कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करा—– युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी कुंटूरकर यांची मागणी -NNL

by nandednewslive
0 comment

नायगांव, रामप्रसाद चन्‍नावार। नायगांव शहरापासून जवळच असलेल्या मौजे कुंटूर येथील 2021 22 च्या अंतर्गत पूर्वीचे प्राथमिक आरोग्य उध्वस्त करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे. त्या इमारतीचे परिपूर्ण काम न करता गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांनी थातूरमातूर काम करून निकृष्ट दर्जाचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णत्वाकडे नेले असल्यामुळे येणाऱ्या काळात कुठल्याही परिस्थितीत दवाखान्याची इमारत उध्वस्त होऊ शकते.

उद्घाटनापूर्वीच स्लॅप आतुन पाणी थेंबा थेंबाने साचत असल्याचेही दिसत आहे. गेल्या अनेक दिवसात अनेक वर्तमान पत्रामध्ये बातम्या येऊन सुद्धा शासनाने लाखो रुपये खर्च करून गेल्या अनेक दिवसांमध्ये इमारत नसल्याकारणाने या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असता स्थानिक वैद्यकीय अधिकारी व गुत्तेदार यांच्या मनमानी कारभाराने बांधकाम हे थातूरमातूर पद्धतीचे करून भविष्यात आरोग्य केंद्रास धोका होऊ शकतो.

सध्या आरोग्य केंद्र ग्रामपंचायतच्या इमारतीमध्ये असल्यामुळे तिथे सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. डॉक्टर वेळोवेळी येत नसल्याने परिसरातील रुग्णानां नाहक त्रासांना सामोरे जाताना दिसत आहे. सदरील करण्यात आलेल्या बांधकामाची शासकीय नियमानुसार चौकशी करून सदरील गुत्तेदार इमारतीमध्ये पूर्वीप्रमाणे दवाखाना व दवाखान्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात यावे. असेही कुंटूरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

असे असताना सुद्धा संबंधित गुत्तेदारावर किंवा अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी शिवसेना युवा तालुकाप्रमुख शिवाजी विद्यार्थी नांदेड जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व संबंधित विभागांना पत्रेव्यवहार केला आहे. तेव्हा येणाऱ्या काळात सर्जे गुरुजी कंट्रक्शनवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. नवीन बांधकामात असलेल्या इमारतीचे इंजिनिअरच्या माध्यमातून सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावे असे कुंटूरकर यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!