पुणे। पर्यावरण क्षेत्रात लिखाण करणाऱ्या पत्रकारांच्या प्रोत्साहनार्थ ‘तेर पोलिसी सेंटर या संस्थेतर्फे फेलोशिप देण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तेर पोलिसी सेंटर च्या संचालक डॉ. विनीता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘तेर पोलिसी सेंटर तर्फे ‘पर्यावरणीय पत्रकारिता फेलोशिप’ देण्यात येते. या फेलोशिप चे हे दुसरे वर्ष आहे.अर्जदारांनी आपल्या अर्जाबरोबर वैयक्तिक माहिती जोडावी. तसेच प्रकाशित झालेल्या किमान ३ बातम्यांचे / लेखांचे नमुने किंवा दुरचित्रवाणी/यु ट्यूब चॅनेल वर काम करत असल्यास प्रसारित झालेले ३ व्हीडीओ पाठवावेत. तेर पोलिसी सेंटर व बाह्य तज्ज्ञ परीक्षकामार्फत अर्जाचे मूल्यमापन केले जाईल. निवडलेल्या व्यक्तीला दहा हजार रुपये फेलोशिप रक्कम देण्यात येईल.
फेलोशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारिख ३१ जानेवारी २०२३ ही असून अर्जदार पत्रकारिता क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील रहिवासी व्यक्ती असावी, अर्जासाठी भाषेचे बंधन नाही, असेही संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.नोंदणीसाठी खालील लिंकवरील गुगल फॉर्म भरा.
https://docs.google.com/forms/d/1flMJDf_I77ml9sVq2msZzsi2oaoRJttcdohjQuFfPxI/edit?pli=1 अधिक माहिती www.terrepolicycentre.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
तेर पोलिसी सेंटर ही एक विना नफा या तत्वावर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. जी पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी काम करते, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देते. याच धर्तीवर पर्यावरणसंबंधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांकडून पर्यावरण पत्रकारिता शिष्यवृत्ती २०२३ साठी अर्ज मागवण्यात येत आहेत.