
हदगाव, गजानन जिदेवार। नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान युवा शाही विद्यार्थी संघटनेच्या वतीने, मार्च 2017 पासुन प्रलंबित असलेल्या अभियोग्यता / बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन करण्यात यावे,यासह केंद्र प्रमुख पदभरती प्रक्रिया 40-30-30 राबविण्यात यावी.

पवित्र पोर्टल अंतर्गत मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने चालत असलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी व कमालीची वयोमर्यादा उलटून नैराश्यात अडकलेल्या गुणवत्ता पूर्ण पात्रता धारक अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा, उर्दू माध्यमांच्या उमेदवारांना पवित्र पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात यावे.

मराठी भाषेचा अभिजित दर्जा टिकविण्यासाठी मागील 15 वर्षापासून अल्प वेतनावर कार्यरत असलेल्या मानसेवी शिक्षकांची वेतन अदा करुन जाचक अटी रद्द करण्यात याव्यात , पवित्र पोर्टल अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या आगामी भरतीमध्ये बी काॕम धारकांना संधी देण्यात यावी , शिक्षक पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील ९५०१ बोगस प्रमाणपत्र धारकावर कडक कारवाई करुन सेवेत असलेल्या संबंधितांना कार्यमुक्त करण्यात यावे.

ईतर बोगस प्रमाणपत्र धारकांना येत्या अभियोग्यता/ बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्याची मुभा देण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन सादर करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, शिक्षण मंत्री मा नामदार दिपकजी केसरकर यांच्याशी चर्चा केली. सोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या व संबंधित मागण्यांवर कारवाई करण्याची विनंती केली यावेळी युवाशाही संघटनेचे तुषार देशमुख, प्रदीप मुळे, शशांक भोयर,अन्य उमेदवार उपस्थित होते.

