
नांदेड। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्यव्यापी हाकेनुसार शहरातील एमजीएम कॉलेज ते प्रियदर्शनी शाळेपर्यंत मशाल रॅलीचे आयोजन दि.३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजता नांदेड शहर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष देशभर मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले,सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, कॉ. अण्णा भाऊ साठे आदी महापुरुषांनी यांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष करून महिलांना अधिकार न्याय सुरक्षा देऊन महिलांचा सन्मान केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात व राज्यांमध्ये अनेक पक्षांची सरकारे आलीत आणि गेलीत परंतु महिलांच्या सुरक्षेचे आश्वासन पूर्ण अद्याप झालेले नाही. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आजही ऐरणीवर आहेत.

महिला आजही दिवसादेखील सुरक्षित नाहीत. रात्रीच्या काळोखात महिलांचे अपहरण बलात्कार करून खून केला जात आहेत. हुंडाबळी आणि अन्याय दररोज देशभरात सुरू आहेत. कायदे करू नये यात सुधारणा होत नाही किंबहुना कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या निषेधार्थ अभाजनवादी महिला संघटनेने दिनांक ३० डिसेंबर रोजी महिलांना सन्मान सुरक्षा व समान अधिकार द्या. अशा घोषणा देत एमजीएम कॉलेज ते प्रियदर्शनी शाळेपर्यंत मशाल रॅली काढून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड,अर्धापूर तालुका निमंत्रक कॉ.सुंदरबाई वाहूळकर आदींची भाषणे झालीत.

या कार्यक्रमात आणि मशाल रॅलीमध्ये सुनिता कोलते, सविता कोलते छायाबाई निळकंठ लक्ष्मीबाई हातागळे राधाबाई पारधे शितल गायकवाड दीपिका हातागळे लक्ष्मीबाई कंधारे बेबी गायकवाड स्नेहलता भिसे सीमा वावळे यांच्यासह अनेक महिला सामील झाल्या होत्या. दि.२जानेवारी रोजी अ.भा.जनवादी महिला संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर दलित अन्याय प्रकरण घेऊन अमरण उपोषण आणि बेमुद्दत ठिय्या आंदोलन होणार असून त्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनी सामील होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

