
नांदेड। गुरुवर्य कै. प्र. ता. जोशी (नाना), धुळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फांऊडेशनतर्फे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रभर भ्रमण करून आयुर्वेद प्रचार प्रसार करणार्या या रथयात्रेचे गुरुवार दि. 29/12/22 रोजी नांदेड शहरात आगमन झाले. यावेळी त्यांचा शिष्यगण, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले. बी.ए.एम.एस.पदवीधर जे विविध वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधीत्व करतात या रथ यात्रेमध्ये एकदिलाने सहभागी होते.

या रथयात्रेचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उद्घाटन करण्यात आले. ही रथयात्रा आयटीआय कॉर्नर ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नांदेड या मार्गावर संपन्न झाली. या रथयात्रेमध्ये शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील अनेक भावी डॉक्टरमंडळी, प्राध्यापकवृंद, ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ तसेच नांदेड शहरातील निमा नांदेड व निमा वुमेन्स फोरम्स, निमा स्टुडेंट फोरमचे सदस्य तसेच आयुर्वेद व्यासपीठ महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

यावेळी डॉ. विश्वांभर पवार, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीराम कल्याणकर, डॉ. संदीप पचलिंग, डॉ. भास्कर जन्नावार, डॉ. संजय देलमडे, डॉ एस एम बंग, डॉ. प्रफुल्ल मुदंडा, डॉ. अशोक उत्तरवार, डॉ. मदन टोंगे, डॉ. शिवानंद बासरे. डॉ. शीरीष बंडेवार, डॉ. हेमंत इंगळे, द डॉ. सूर्यप्रकाश बोकारे, डॉ. संजय करवा, डॉ. विजय सुरवे, डॉ. उत्तम इंगळे, डॉ. नरेंद्र कसबे, डॉ करूणा जमदाडे, डॉ माया पवार, डॉ शुभांगी मनाठकार, डॉ श्रद्धा पांडे,डॉ सुनीता वैजवाडे डॉ सुरखा पवार,डॉ उषा उत्तरवार आदींची उपस्थिती होती.

या रथयात्रेमध्ये आरोग्य शिबिर व वैद्यकीय मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन स्वामी समर्थ मंदिर, सामेश कॉलनी, नांदेड येथे पूर्ण दिवस करण्यात आले होते. आयोजित आरोग्य शिबिरात अनेक रुग्णांना तपासणी करुन घेतली, या रुग्णांना सात दिवसांची आयुर्वेदीक औषधी मोफत देण्यात आली. शिबिर व व्याख्यानाचा समारोप अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्य मार्गदर्शनाने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख प्रास्ताविक डॉ. विश्वांभर पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले.

