
हदगाव, गजानन जिदेवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कल्याण टोल इन्फोटेक्चर लि. या कंपनीने हदगाव तालुक्यातील अवैध रित्या उत्खनन केलेल्या गौण खनिज उत्खननाची ईटीएस मोजणी करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी श्री. अनिल कदम पाटील यांनी उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे केली होती.

त्यानुसार अवैधरित्या उत्खनन केलेल्या गौण खनिज उत्खनाची ईटीएस मोजणी दि ७/१०/२०२२ रोजी करण्यात आली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये या ईटीएस मोजणीचा अहवाल दि. ११/१०/२०२२ रोजी कार्यालयात प्राप्त झाला आहे. व त्या इटीएस मोजणी अहवालामध्ये ७२ बहात्तर हजार ब्रास उत्खनन झाल्याची स्पष्ट उल्लेख देखील करण्यात आला आहे.

तरी देखील त्यावर उपविभागीय अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी दिरंगाई करत असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या कंपनीवर कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री. अनिल दिगंबर कदम पाटील यांनी लेखी निवेदन देऊन जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

