Tuesday, February 7, 2023
Home नागपूर नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस रेल्वे संदर्भांत राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे वैभव बहुतूले यांच्या मागणीला यश -NNL

नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस रेल्वे संदर्भांत राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे वैभव बहुतूले यांच्या मागणीला यश -NNL

by nandednewslive
0 comment

कोकण/विदर्भ/खान्देश। नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला २५ फेब्रुवारी २३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही गाडी आता २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत धावणार आहे. नागपुर मडगाव प्रतिक्षा एक्स्प्रेस रेल्वे संदर्भांत राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे वैभव बहुतूले यांनी केलेल्या मागणीला यशमिळाले आहे.

विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रेल्वे गाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. गणेशोत्सव व दिपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते मडगाव (गोवा) (०११३९/०११४०) ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी १ जानेवारी २३पर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, या गाडीची वाढती मागणी लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा शबनम शेख,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत,राष्ट्रीय रेल्वे शेगांव समिती सदस्य व सल्लागार ॲड पुरुषोत्तम डांगरा,प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल कल्याण ते सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब यांनी ०११३९/०११४० नागपूर जंक्शन मडगाव (गोवा) प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसला मनमाड जं,

पाचोरा जं,चाळीसगाव जं,जळगाव जं,नांदुरा,मूर्तीजापूर थांबा मंजुर करण्यासाठी प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री मा श्री अश्विनी वैष्णव,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे,रस्ते वाहतूक दळणवळण महामार्ग राजमार्ग सडक परिवहनमंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.अध्यक्ष रेल्वे बोर्ड,रेल भवन नवी दिल्ली,मा.उप निर्देशक (कोचिंग),रेल भवन नवी दिल्ली यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे*

banner

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे. त्यानुसार ही गाडी नागपूर जंक्शन येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी ०३ वाजुन ०५ मिनिटांनी सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगाव गोवाला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५.४५ वाजता पोहोचेल.

मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव गोवा येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.मडगाव (गोवा) ते नागपूर जंक्शन दरम्यान धावताना ही गाडी (०११४०) गुरुवार तसेच रविवारी मडगाव (गोवा) येथून रात्री ०८.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता ते नागपूर जंक्शनला पोहोचेल.

नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव बडनेरा जं, अकोला जं,शेगांव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम(गोवा), तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ३२ फेऱ्या होणार आहेत तसेच या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.inquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर सुरू २७ डिसेंबर पासुन करण्यात आले आहे.

नागपूर मडगाव गोवा प्रतिक्षा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,राष्ट्रीय रेल्वे समिती सदस्य व सल्लागार ॲड पुरुषोत्तम डांगरा, प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष शेखर नागपाल, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा शबनम शेख,राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतूले,राष्ट्रीय संघटनमंत्री ओमकार माळगांवकर,राष्ट्रीय संपर्कप्रमुख हर्षद भगत, दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड तालुकाध्यक्ष संदेश गांधी,प्रवासी सुधिर राठोड,दिपक सोनवणे,गजानन राठोड,विदर्भ खान्देश विद्यार्थी-विद्यार्थीनी प्राध्यापक प्राचार्य शिक्षक-शिक्षिका आदिनी केले आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!