
हिमायतनगर। मनुष्याला मातृ-पितृछत्र कायमच हवं असतं. मोदीजींना मातृछत्र १०० वर्षं लाभलं. आईचे आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबत राहणार अशा महान पवित्र आत्मा असलेल्या स्व हिरबेन मोदी यांना भारतीय जनता पार्टी हिमायतनगर (वाढोणा) तालुक्याच्या वतीने श्री परमेश्वर मंदिर समोरील मैदानामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी श्रद्धांजलीपर दोन शब्द व्यक्त करते वेळेस श्री शाम रायेवार व कांता गुरु वाळके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान, शिवसेना तालुका प्रमुख राम ठाकरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, भाजपा शहराध्यक्ष खंडू चव्हाण, सुभाष माने, महेश पाटील, राहुल पाटील, राम नरवाडे, राम जाधव, दैवया सेठ, संजय पेन्शनवार, कात्रे मामा, प्रकाश जैन, अनिल नाईक, मुन्ना शिंदे, संदीप मादसवार, चव्हान मामा, काशिनाथ गड्डमवार, दुर्गेश मंडोजवार, शितल सेवनकर, ज्ञानेश्र्वर पंदलवाड, वामनराव पाटील वडगावकर, विनायक ढोणे,

अभिलाष जयस्वाल, बालाजी ढोणे, सचिन कोमावार, राम पाकलवार, नितीन मुधोळकर, केदार पोपश्टवार, परमेश्र्वर जाधव, नामदेव सुर्यवंशी, दिलीप ढोणे, संतोष धम्पलवार, विठ्ठल गुंडाळे, राऊतराव सर, प्रकाश सेवनकर, सुधाकर चीट्ठेवार, महावीर मांगुळकर, अजय सुंकलवार, गोविंद तोडकरी, बाळू दमकोंडवार, गणेश जाधव, राहुल खडके, नामदेव सुर्यवंशी, भंडारे मामा, गजानन माने यासह सर्व भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

