
कंधार, सचिन मोरे| कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड कंधार येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मि.पौ.शु ९ शके १९४४ पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा ज्ञानयज्ञ ३१ डिसेंबर रोज शनिवार पासून प्रारंभ होत.असून ७ जानेवारी २०२३ रोजी मंगळवारी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या ज्ञानयज्ञाची सांगता होणार आहे.

कंधार- लोहा तालूक्यातील पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र भगवानगड कंधार-लोहा ता कंधार वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.पहाटे ४ ते ६ काकड भजन. सकाळी ६ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण. सकाळी १० ते १२ गाथा भजन . दुपारी १ते४ भागवत कथा. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे.

ज्ञानयज्ञ भागवत कथाकार ह.भ.प.माधव महाराज केंद्रे माळाकोळी रात्री ८ ते १० किर्तनकार म्हणून ह.भ.प गोपीनाथ महाराज केंद्रे आनंदवाडी ह.भ.प माधव महाराज देवकत्ते घागरदरा ह.भ.प नारायण महाराज शास्त्री पळसवाडी ह.भ.प भरत महाराज जोगी विनोदाचार्य ह.भ.प देविदास महाराज गिते चोंडीकर ह.भ.प गणेश महाराज गुट्टे आळंदी ह.भ.प मनोहर महाराज आळंदी काल्याचे किर्तनकार कार ह.भ.प वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर यांची उपस्थिती राहणार आहे.

या सप्ताहात कंधार- लोहा तालुक्यातील पंचक्रोशितील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आव्हान संयोजन समिती भगवानगड कंधार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

