Saturday, January 28, 2023
Home कंधार कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव अभिष्टचिंतन सोहळयाचे १ जानेवारी आयोजन..NNL

कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव अभिष्टचिंतन सोहळयाचे १ जानेवारी आयोजन..NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। कर्मयोगी डॉ.नानासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १ जानेवारी २३ रोजी गांधीनगर या.कंधार येथे अभिष्टचिंतन सोहळा व बिड येथील सुप्रसिध्द किर्तनकार हभप राधाताई सानप यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी साखर तुला, दिनदर्शिका, पुस्तक प्रकाशन,व विविध दैनिक प्रकाशन संभारभ आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षीही कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्य ‘अभिष्टचितंन सोहळा दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोज रविवार सायंकाळी ४ वाजता मौजे गांधीनगर (दिग्रस खुर्द) ता. कंधार जि.नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

यावेळी ह.भ.प. राधाताई सानप (प्रसिध्द किर्तनकार )यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे, यावेळी नानासाहेब जाधव यांच्यी साखर तुला ,दिनदर्शिका व कर्मयोगी नानासाहेब जाधव पुस्तक प्रकाशन व विविध दैनिक प्रकाशन संभारभ आयोजन करण्यात आला आहे.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.अॅड. श्रीनिवास जाधव नगरसेवक नांदेड शहर वाघाळा महानगर पालिका व सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ परिवार व कार्यक्रमाचे समन्वयक बाजीराव ताटे, शिवाजी कानवटे ,सुधाकर थोटे यांनी केले आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!