
हिमायतनगर/उमरखेड। उमरखेड तालुक्यातील पोफाळी साखर कारखाण्यातील ३०० ते ३५० कर्मचाऱ्यांसोबत थर्टिफस्ट साजरा करून खासदार हेमंत पाटिल यांनी कर्मचाऱ्यां सोबत जेवन करून, पेढा भरवला, आनंदोत्सव साजरा केला.

सर्वजन वेवेगळ्या पध्दतीने “थर्टिफस्ट” मित्र मैत्रिणी, सोबत नविन वर्ष साजरे करत असतात, शेतकऱ्यांची कामधेनु समजला जाणारा पोफाळी ता. उमरखेड येथिल २२ हजार सभासद असनारा साखर कारखाना बंद अवस्थेत होता. या भागातील शेतकरी, बेरोजगार तरूण, कामगार यांचा मोठ्या प्रमाणात कारखाना सुरू करण्याचा आग्रह होता, त्या आग्रहाला मान देवुन, सतत पाठपुरावा करत कारखाना सुरू करण्याचे धाडस खासदार हेमंत पाटिल यांनी करून दाखवले.

गेल्या दोन महिण्या पासुन ३०० ते ३५० कामगार कारखाण्यात काम करीत असुन गळीत हंगाम २०२३ लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन खासदार हेमंत पाटिल कारखाण्यावर तळ ठोकुन आहेत, सर्व खाते प्रमुखांच्या बैठका घेवुन तसेच सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेवुन अडचनी समजुन घेत आहेत.

कारखाण्यावर हिंगोली लोकसभा मतदार संघातील ३०० बेरोजगार तरूणांना नौकरी देवुन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व कामगारांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन यावेळी कारखाण्यातील कामगारां सोबत थर्टि फस्ट साजरा करण्याचा निर्णय खासदार महोदयांनी घेतला.

कामगारां सोबत खिचडी, भजे, कडी जेवन करून मिठाई भरवत सर्व कामगारांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ऐरवी संचालक मंडळ, चेअरमन, कामगार वर्ग यांच्यात एक दुरावा असतो परंतु खासदार असनारे एक व्यक्ती जमिनीवर बसुन , आपल्या सोबत जेवन घेत असल्याचा निखळ आनंद कर्मचाऱ्यांनी घेतला, यानिमित्ताने खासदार हेमंत पाटिल यांच्यातील कार्यकर्ता त्यांना अनुभवायला मिळाला.

