
नांदेड| येथील दमा छाती रोग तज्ञ डॉ .भरत अनिल तोष्णीवाल यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्यासाठी यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .

द इंडियन कॉलेज ऑफ एलर्जी अस्थमा व इम्युनोलॉजी नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय परिषदेमध्ये डॉ भरत तोष्णीवाल यांनी आपला शोध निबंध सादर केलेला होता .सदर शोध निबंधास संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाची पसंती देत यंग सायंटिस्ट अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले .३५ वर्ष वयोगटाखालील या तरुण वैज्ञानिक पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली .सदर पुरस्कार पुणे येथे पार पडलेल्या परिषदेमध्ये सन्मान चिन्ह व पुरस्कार देऊन डॉ . भरत तोष्णीवाल यांना सन्मानित करण्यात आले .

डॉ भरत अनिल तोष्णीवाल हे मागील पाच वर्षापासून दमा , क्षयरोग , छाती विकार व ॲलर्जी तज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून कोविड काळातही त्यांनी उत्कृष्टपणे सेवा दिलेली आहे ज्यामुळे गुंतागुंतीच्या कोविड रुग्णांना जीवनदान लाभले होते .त्यांचे हे कार्य पाहून राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या गेलेल्या छाती विकार ऍलर्जी दमा क्षयरोग यांच्या विविध चर्चासत्रांमध्ये डॉ भरत तोष्णीवाल यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते .

तेथे डॉ भरत यांनी दमा अस्थमा क्षयरोग एलर्जीच्या संबंधित वारंवार होणारी सर्दी ,शिंका , दम लागणे ,खोकला येणे आदि बाबी हे एलर्जीचे लक्षण असून यावर एलर्जीचे योग्य प्रकारे निदान व औषधोपचार केल्याने एलर्जीचा त्रास कमी करता येऊ शकते ,अशा रुग्णांना नाविन्यपूर्ण पद्धतीने हाताळल्याचे अनुभव कथन करीत याचा लाभ राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय व्यावसायिकांना मिळवून दिलेला आहे .सदर तरुण वैज्ञानिक पुरस्काराबद्दल डॉ भरत तोष्णीवाल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

