
नांदेड| मागील चौदा वर्षापासून देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत दि.5 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता मिनी सह्याद्री रेस्ट हाऊस, नांदेड येथे प्रदान करण्यात येणार आहेत.

मीमांसा फाऊंडेशन, मिडीया-पोलीस सोशल क्लब, पत्रकार प्रेस परिषद, दै.समीक्षा, व्हाईस ऑफ मिडीया, मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे.

यावर्षी डॉ.शंकररावजी चव्हाण पत्रकारिता पुरस्कार मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत मुंबईच्या प्रेरणा जंगम, कै.सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार परळी येथील दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांना देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.

मागील 30 वर्षापेक्षा अधिक काळापासून वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत दै.महासागरचे ज्येष्ठ संपादक एम.एम.बेंद्रीकर यांना स्व.रामेश्वर बियाणी जीवन गौरव पुरस्कार तर नायगावचे सुर्यकांत सोनखेडकर स्व.अनिल कोकीळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार, डॉ.शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कार (ग्रामीण) अर्धापूरचे रामराव भालेराव, समीक्षा कर्तृत्व सन्मान पुरस्कार बिलोलीचे गोविंद मुंडकर, पंचनामाकार लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जय महाराष्ट्र लातुरचे सचिन अंकुलगे,

मीमांसा फाऊंडेशन ह्युमन राईट्स पुरस्कार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार (शहर) प्रमोद योगी, स्व.अनंतराव नागापूरकर वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार (ग्रामीण) उमरीचे गोविंद ढगे, वृत्तपत्र क्षेत्रातील जाहिरात आधारस्तंभ भोकरचे बी.आर.पांचाळ, मंथन क्रिएटिव्ह डिजीटल मिडीया पुरस्कार नमस्कार महाराष्ट्रचे संघरत्न पवार, वृत्तपत्र क्षेत्रातील सहकारी दुवा (संगणक चालक) लोकमतचे पुरूषोत्तम काशटवार, वृत्तपत्र क्षेत्रातील तिसरा डोळा (फोटोग्राफर) किनवटचे के.मुर्ती, स्व.माधव अंबुलगेकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार कंधारचे गणेश कुंटेवार, स्व.सुरेश पटणे मुद्रण सेवा पुरस्कार रमेश आवटे यांना जाहीर झाले आहेत.

सदरील सोहळ्यात उत्कृष्ट दिवाळी अंकाबद्दल पुरस्कार मिळालेले दै.सत्यप्रभाचे संपादक संतोष पांडागळे, सामुहिक विवाह सोहळ्यातून सामाजीक क्षेत्रात सेवा देणारे बजरंग शुक्ला, घुमान यात्रेतून दर्शन घडवणारे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे व जाहिरात क्षेत्रात पुरस्कार मिळावणारे मारोती सवंडकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे रामेश्वर धुमाळ, पत्रकार प्रेस परिषदेचे प्रदेश प्रभारी अरविंद जाधव, मराठवाडा अध्यक्ष सखाराम कुलकर्णी, कोषाध्यक्ष ज्ञानोबा पवार, रमेश तिवारी, सचिव सुनिल कुलकर्णी, सौ.संगीताताई बारडकर, सौ.उज्वला दर्डा, सौ.सविता गबाळे, सौ.अरूणा पुरी, मो.तनवीर, शिवहारी गाढे तथा संपादक रूपेश पाडमुख यांनी केले आहे.
