
हदगाव, शे चांदपाशा। मागील काही दिवसांपासून शहरात धुळीच्या प्रमाणात अचानक वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या धुळीमुळे आजारांना निमंत्रण मिळत असून दमा, खोकला, छातीत जळजळणे, यांसारख्या आजारांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तरी याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अस हदगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते काँ. शाम लाहोटी यांनी मागणी केली आहे.

शहरातील काही विशिष्ट भागातच रोडची कामे झालेली आहे. या बाबतीत विद्यमान आमदारांनी यापुर्वी झालेल्या नागरी सुविधाच्या संबंधी अवलोकन करने फार गरजचे आहे. अशी सुजान नागरिकांची मागणी आहे. शहरातील रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमुळे ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जात आहे. शहरात मुख्य रस्त्यांवरील संथपणे होणाऱ्या रोड रोडच्या कामामुळे आजूबाजूला धुळीचे साम्राज्य आहे.

तसेच रस्त्यावर व बाजूला असलेल्या नाल्यावर व दुकानात घरात सुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ साचत असल्याने रस्त्यावरून वाहन थोडी जरी हवा जरी आली तरी धुळीचे लोट उठतात त्यातील हलक्या कणाचा हवेशी संपर्क आल्यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढत आहे. तसेच शहरातील रोडवर देखील मोठया प्रमाणात धूळ साचली आहे. तरी यासाठी नगरपालिका प्रशासनाने या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्यात यावीत याशिवाय रस्त्यांची काही कामे नगरपालिकेच्या अधिपत्याखाली सुरू आहेत.

त्यातच नव्यानेच तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा संबंधित ठेकेदाराने बांधकामासाठी आणलेले मुरूम साहित्य तसेच रस्त्यावर पडू दिले आहे त्यामुळे देखील धुळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर असाच काहीसा प्रकार तहसील रोडवर तहसिल कार्यालयासमोरील रोडवर देखील झाला आहे. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आपल्या बांधकाम साहित्य हटवणे गरजेचे आहे. अन्यथा नगर पालिकेला असलेले अधिकार वापरून संबंधित दंडात्मक कारवाई करण्याची मागणी देखील काँ.शाम लाहोटी यांची आहे.

आमदारांनी ‘जनता दरबार ‘ घ्याव ..!
शहरातील नागरी समस्या बाबतीत अर्ज तक्रारी केल्या तरी स्थानिय पातळीवर सहसा दखल घेण्यात येत नाही. हदगाव शहरात जिल्हाअधिकारी व पोलिस अधिक्षक हे केव्हा येतात आले तरी ते नागरिकिशी समन्वय साधत नाही. यामुळे आता शहरातील तालुक्यातिल ञस्त सर्वसाधारण जनतेचा प्रशासनाकडुन अपेक्षा भंग होतांना दिसुन येत आहे. या करिता विद्यमान आमदारांनी जनतेच्या समस्या निपटण्याकरिता ‘जनता दरबार ‘घ्याव अशी बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे.

