नांदेड। ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित लोकांना न्याय देण्यासाठी काम केले. नाही रे म्हणणार्यांसाठी नेहमीच त्यांनी आग्रहाची भुमिका घेतली.
सर्वसामान्यांसाठी ते नेहमीच अग्रेसर होते. लोकसभा व विधानसभा त्यांनी सक्षमपणे गाजवून अनेक प्रश्न सोडविले. त्यांच्या निधनाने सामाजिक व शैक्षणिक निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हा मन्याडचा वाघ हरपला असा शोकसंदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी व्यक्त केली.