Saturday, January 28, 2023
Home मुखेड राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिवाजी कराळे यांची निवड -NNL

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिवाजी कराळे यांची निवड -NNL

by nandednewslive
0 comment

मुखेड| येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड येथील उपक्रमशील,तंत्रस्नेही व अष्टपैलू शिक्षक श्री शिवाजी कराळे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२१-२२ या वषार्साठी दिल्या जाणाºया क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षक गटातून निवड झाली असून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ३ जानेवारी २०२३ रोजी या पुरस्काराचे मुंबई येथे वितरण करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत नवनवीन उपक्रमांचे आयोजन करणे,स्पर्धा परीक्षेची तयारी घेणे, शैक्षणिक साहित्य-ब्लॉग तयार करणे इत्यादी कायार्सोबतच त्यांनी सतत २० वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोविड-१९ मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक लाख रु.पेक्षा जास्त रक्कम संकलित करणे,उत्कृष्ट केंद्रस्तरीय अधिकारी म्हणूनही कार्य केले आहे.विविध नियतकालिकात स्तंभलेखक म्हणून लेखन केले असून त्यांचे विविध विषयावरील १५ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.ते उच्च विद्या विभूषित असून शिक्षण हक्क कायदा या विषयावर त्यांनी नुकतेच संशोधन कार्य- पीएच.डी.संशोधन पूर्ण केले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल मुखेडचे आ.डॉ.तुषार राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,अविनाशराव घाटे,जि.प.नांदेडचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर,भाऊसाहेब पा.मंडलापुरकर, प्राचार्य मनोहरराव तोटरे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,जि.प.हा.सावरगाव येथील मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदासराव बस्वदे,संयुक्त चिटणीस दिलीपराव देवकांबळे, विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे,भागवत पाटील,केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड,श्रीपत वाडीकर, सोमनाथ कुंभार,गजानन पवितवार,गजानन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार शिक्षक,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!