नांदेड| संभाजी ब्रिगेड नांदेड विभागीय अध्यक्षपदी संकेत पाटील तर उत्तर जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील,महानगराध्यक्ष पदी सतीश धुमाळ यांची निवड संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्र दिले.
जिल्हाध्यक्ष पदासाठी, मंगळवार ०३नोव्हेंबर रोजी उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी यशवंतराव चव्हाण वस्तिगृह नांदेड येथे मुलाखती झाल्या होत्या. संभाजी ब्रिगेड केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे , संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.बालाजी जाधव यांनी मुलाखती घेतल्या होत्या.
नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी व महानगराध्यक्ष पदासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या होत्या.संकेत पाटील यांच्या कडे याआधी सिडको अध्यक्ष, नांदेड जिल्हा सहसचिव,महानगराध्यक्ष,नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष पदे होते त्यांच्या पत्नी ज्योती पाटील ह्या संभाजी ब्रिगेडच्या महानगरपालीका उमेद्वार होत्या. त्यांची एक प्रशिक्षीत कार्यकर्ता म्हणून ओळख आहे म्हणून त्यांची आता लोकसभा अध्यक्ष पदावरुन बढती होवुन नांदेड,परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या नांदेड विभागीय अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
परमेश्वर पाटील यांच्याकडे नांदेड उत्तर जिल्हासचिव पद होते त्यांची उत्तर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तर सतीश धुमाळ यांची महानगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.सुभाष कोल्हे, भगवान कदम या दोघे व नुतन विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,महानगराध्यक्ष असे मिळुन पाच जणांकडे पदभार असल्यामुळे जिल्हयामधे संभाजी ब्रिगेड चे कार्य पहिल्यापेक्षाही वाढणार हे चित्र दिसुन येत आहे.
नांदेड जिल्हयाचे लक्ष या निवडी कडे होते. मात्तबरांनी मुलाखती दिल्या असल्यामुळे निरीक्षकांची खुप तारांबळ उडाली हेही तेवढेच खरे. नुतन विधानसभा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष,महानगराध्यक्षांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.