Tuesday, February 7, 2023
Home बिलोली सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात कायमस्वरुपी दोन वैद्यकीय अधिकारी, रिक्त कर्माचार्‍याची नियुक्ती त्वरीत करा – शंकर महाजन -NNL

सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केद्रात कायमस्वरुपी दोन वैद्यकीय अधिकारी, रिक्त कर्माचार्‍याची नियुक्ती त्वरीत करा – शंकर महाजन -NNL

by nandednewslive
0 comment

बिलोली। मौजे सगरोळी ता.बिलोली जि.नांदेड येथील सगरोळी गावची लोकसंख्या १० हजार ईतकी आहे तर उपकेद्रा अंतर्गत येनारी लोकसंख्या अंदाजे २० हजार आहे.या मुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी प्राथमिक आरोग्य केद्र सगरोळी असताना या ठिकानी कायमस्वरुपी रहानारे वैद्यकीय अधिकारी न देता खतगाव, लोहगाव दोन प्राथमिक आरोग्य केद्रात नियुक्ती असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍याकडे सगरोळीचा चार्ज देऊन सगरोळी येथील नागरीकांच्या जिवीताशी खेळण्याचे काम आरोग्य विभागा कडुन होत आहे. असे अरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य यानी केली आहे

तसेच सगरोळी प्राथमिक आरोग्य केद्राला दोन वैद्यकीय अधिकारी (निवासी रहानारे) याची त्वरीत नियुक्ती करा. व सगरोळी येथील रुग्णवाहीका चालक हे रोजदारीवर आहे त्याची नियुक्ती कञाटी पद्धतीवर करा. सगरोळी प्राथमिक आरोग्य केद्र व उप केद्रातील नर्स आरोग्य सेवीका व ईतर रिक्त जागेवरील कर्मचारी पद त्वरीत नियुक्त करा तसेच सगरोळी येथील उपकेद्र अंतर्गत येनारी लोकसंख्या १५ हजारच्यावर आहे.

यामुळे केद्र व राज्य शासनाचे आरोग्य विषयी आनेक योजना राबन्यासाठी सि.एच.ओ चि नियुक्ती कराण्यात यावे तसेच मागील बर्‍याच वर्षापासुन कर्मचारी नसल्यामुळे उपकेद्र बंद आहे त्या ठिकानचे कर्मचार्‍याची नियुक्ती ही करावी असे ईमेल द्वारे मागणी केली आहे.

मुख्यमंञी, आरोग्य मंञी,जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी आधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे. वरील मागण्या १५ दिवसात पुर्ण न केल्यास पुढील काळात वंचित बहुजन आघाडी, सगरोळी परिवर्तन समिती, सगरोळी गावकर्‍याकडु तालुका आरोग्य कार्यालय फोडण्यात ईशारा ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी दिला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेईल या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!