
नवीन नांदेड। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिडको हडको शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी अजित सिंघ उर्फ जितूसिंघ टाक यांची निवड करण्यात आली आहे. सदरील निवड सह संपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, मनोजराज भंडारी, शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे, बबन बारसे, महानगरप्रमुख पप्पू जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आली.


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातील शिवसेनेला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात शिवसेना अधिक भक्कम करण्याच्या अनुषंगाने नवनियुक्त जिल्हाप्रमुख दक्षिण दता पाटील कोकाटे,माधव पावडे आणि बबन बारसे यांच्या नेतत्वाखाली संघटनात्मक बांधणी सुरू आहे.


या निवडीबद्दल संपर्क प्रमुख भुंजगराव पाटील डक,प्रकाश मारावार, जिल्हा प्रमुख बबनराव बारसे,शहर प्रमुख पप्पु जाधव,वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ब्रिज लाल भगवे, माजी शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड, कृष्णा पांचाळ,संदिप जिल्हेवाड, नेताजी भोसले, बळवंत तेलंग, महिला आघाडीच्या निकिता शहापुरवाड, सतिश खैरे,दिपक देशपांडे,साहेबराव मामीलवाड, संजय काळे, विष्णु कदम, यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर आजी माजी पदाधिकारी यांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.

