
नांदेड। महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी व शीख समाजातील प्रतिष्ठित नागरिक स. राजिंदरसिंघ सिलेदार यांचे शनिवार, दि. 31 डिसेम्बर रोजी सकाळी 10 वाजता सुमारास हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले.

शेवटच्या क्षणी त्यांचे वय 69 वर्षे होते. त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी, मुलगी, मुलगा, सून असा मोठा परिवार आहे. ते खालसा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक दिवंगत सुखदेवसिंघ सिलेदार यांचे भाऊ होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी 7 वाजता नगीनाघाट शमशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुम्बियांनी दिली

