हिमायतनगर। हिमायतनगर ते कोसाई रेल्वेमार्गावर विद्युतीकरण पुर्ण झाले असून 82 किलो मीटर सदर रेल्वेमार्गावर गुरूवार दि. 29 सायंकाळी सात वाजता हिमायतनगर ते कोसाई एका विशेष रेल्वेने चाचणी करण्यात आली आहे.
मुदखेड ते अदिलाबाद रेल्वेमार्गावर विद्युतीकरण अंतिम ठप्पात असून हिमायतनगर ते कोसाई हे रेल्वेमार्गावरील विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. सदर मार्गावर काही तांत्रिक आडचनी आहे काय? म्हणून सिकंदराबाद व नांदेड येथील विशेष पथकांने विद्युत रेल्वेने चाचणी पार पाडली आहे. ह्या पथकाचे नेतृत्व सिकंदराबाद डिव्हिजन चे प्रिन्सिपल ऑफ चिफ ईलेक्ट्रकल अभियंता पि. डी मिश्रा यांनी केले ह्यावेळी त्यांच्यासोबत जवळपास शंभर टेक्निकल स्टॉप सोबत होता.
येण्यार्या मार्च महिन्यात पुढील चाचणी हि हिमायतनगर ते मुदखेड रेल्वेमार्गावर करण्यात येणार असून पुढे सदर मार्गावर विद्युत रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असे मिश्रा यांनी प्रजावानीशी शी बोलताना मिश्रा यांनी सांगीतले. मुदखेड ते अदिलाबाद रेल्वेमार्गावर विद्युतीकरण झाल्याने रेल्वे प्रवाशांकडून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
सदर मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीय असून मात्र सुविधांचा अभाव आहे. या बाबींकडे रेल्ल्वे विभागांच्या वरिष्प्ठांनी लक्ष घालून इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे. व तसेच आता विद्युतीकरण पुर्ण झाले असून आता रेरेल्वे पटरीचे दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण करावे. आसी मागणी रेल्वे प्रवाश्याकडून केली जात आहे.