भोकर। तालुक्यातील सोनारी येथील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीवर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असून यासाठी ओबीसी समन्वय समिती कडून १५ हजाराची मदत तिचे वडील माधव अमेटवाड यांना देण्यात आली.
ओबीसी समन्वय समिती ची बैठक ओबीसी कार्यालय येथे पार पडली. या बैठकीत ओबीसी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करून १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली असल्याने ओबीसी समन्वय समिती भोकर कार्यालयात अभिवादन करण्यात आले. सोबतच सामाजिक भावनेतून सोनारी येथील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीवर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने तिच्या उपचारासाठी १५ हजार ची मदत करण्यात आली.
यावेळी ओबीसी नेते नामदेव आयलवाड, बालाजी तुमवाड, विठ्ठल फुलारी, माधव अमृतवाड, सुरेश बिल्लेवाड, संदीप गौड, मारोती अंगरवार, जगन बुटनवाड, आदिनाथ चिंताकुटे, संतोष अनेराये, ॲड. परमेश्वर पांचाळ, ॲड शेखर कुंटे, अंबादास आटपलवाड, मोहन राठोड, पंडित तोटावाड, राम बोरोड, संतोष आलेवाड, साई केंचे, मुंडसे यांची उपस्थिती होती.