नांदेड| राज्याचा भूमीपुत्र असलेल्या ललित मनोहर नागापूरकर या तरुणाने तयार केलेल्या ड्रोन प्रकल्पाचे मध्यप्रदेशचे वनमंत्री तथा राज घराण्याचे वंशज ना.विजय शाह यांनी आस्थेवाईक माहिती घेवून कौतुक केले.
मुंबईतील अग्निशमन अधिकारी मनोहर श्रीधरराव नागापूरकर यांचा मुलगा ललित हा मुंबईतील ठाकूर इन्स्टिट्यूट ऑफ एव्हीएशन मध्ये शेवटच्या तिसर्या वर्षाला असतानाच प्रेस्टीज ग्रुप ऑफ इंड्रस्टीजचे चेअरमन डॉ.देवेश जैन यांची त्याची भेट झाली. या भेटीत ललितचे ड्रोन टेक्नॉलॉजी चे ज्ञान पाहून त्यांनी त्याला सिईओ पदाची ऑफर दिली होती तो शिक्षण संपताच या पदावर रुजू झाला व त्याने एक वर्षातच एवढी छाप पाडली की त्याचे कार्याची प्रशंसा माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू,नीती आयोगाचे अनेक सदस्य,केंद्रीय व म.प्र.चे अनेक मंत्री यांनी ललितचे ड्रोन लैबला भेट देऊन त्याचे कामाचे कौतुक केले.म.प्र.चेंबर ऑफ कॉमर्सने भोपाळच्या राज्य अधिवेशनात त्याचे ड्रोन टेक्नॉलॉजी वर व्याख्यान ठेवले ज्याचे वृत्त टाइम्समध्ये देखिल आले.राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हेचे कामही मिळाले व अनेक सेमिनारमध्ये व एज्युकेशनल फेस्ट मध्येही भाग घेतला. मध्यप्रदेशात आहे.
त्याने ड्रोन इंजिनइरिंगमध्ये एक प्रकल्प तयार केला आहे. या संशोधनात्मक प्रकल्पाचा वापर प्रशासकीय पातळीवर एका मोहिमेत करण्यात आला होता. नेपानगर प्रशासनाला दुर्गम भागात शोधमोहीमेत या प्रकल्पाचे मोठे सहकार्य लाभले होते. प्रशासकीय पातळीवर या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी मध्यप्रदेशच्या राजघराण्याचे वंशज तथा राज्याचे वनमंत्री ना.विजय शाह यांनी ललितला बोलवून घेतले होते. यावेळी त्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची पूर्ण माहिती घेवून त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केेले.
यावेळी प्रेस्टीज ग्रुपचे चेअरमन डॉ.देवेश जैन, प्रेस्टीज ग्रुप ऑफ इंड्रस्टीचे संचालक डॉ.मनोज देशपांडे, चि.ललित नागापूरकर हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिवंगत श्रीधरराव शंकरराव नागापूरकर, विलासराव देशपांडे चारठाणकर व दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कॉ.अनंतराव नागापूरकर यांचा नातु आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.