बिलोली। मौजे सगरोळी ता.बिलोली जि.नांदेड येथील सगरोळी गावची लोकसंख्या १० हजार ईतकी आहे तर उपकेद्रा अंतर्गत येनारी लोकसंख्या अंदाजे २० हजार आहे.या मुळे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी प्राथमिक आरोग्य केद्र सगरोळी असताना या ठिकानी कायमस्वरुपी रहानारे वैद्यकीय अधिकारी न देता खतगाव, लोहगाव दोन प्राथमिक आरोग्य केद्रात नियुक्ती असलेल्या वैद्यकीय अधिकार्याकडे सगरोळीचा चार्ज देऊन सगरोळी येथील नागरीकांच्या जिवीताशी खेळण्याचे काम आरोग्य विभागा कडुन होत आहे. असे अरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.प सदस्य यानी केली आहे
तसेच सगरोळी प्राथमिक आरोग्य केद्राला दोन वैद्यकीय अधिकारी (निवासी रहानारे) याची त्वरीत नियुक्ती करा. व सगरोळी येथील रुग्णवाहीका चालक हे रोजदारीवर आहे त्याची नियुक्ती कञाटी पद्धतीवर करा. सगरोळी प्राथमिक आरोग्य केद्र व उप केद्रातील नर्स आरोग्य सेवीका व ईतर रिक्त जागेवरील कर्मचारी पद त्वरीत नियुक्त करा तसेच सगरोळी येथील उपकेद्र अंतर्गत येनारी लोकसंख्या १५ हजारच्यावर आहे.
यामुळे केद्र व राज्य शासनाचे आरोग्य विषयी आनेक योजना राबन्यासाठी सि.एच.ओ चि नियुक्ती कराण्यात यावे तसेच मागील बर्याच वर्षापासुन कर्मचारी नसल्यामुळे उपकेद्र बंद आहे त्या ठिकानचे कर्मचार्याची नियुक्ती ही करावी असे ईमेल द्वारे मागणी केली आहे.
मुख्यमंञी, आरोग्य मंञी,जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी आधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे. वरील मागण्या १५ दिवसात पुर्ण न केल्यास पुढील काळात वंचित बहुजन आघाडी, सगरोळी परिवर्तन समिती, सगरोळी गावकर्याकडु तालुका आरोग्य कार्यालय फोडण्यात ईशारा ही वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी दिला आहे. यावर प्रशासन काय निर्णय घेईल या कडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.