
हिमायतनगर| हिमायतनगर येथील बुलढाणा अर्बन शाखेचे सभासद विलास विनायक जाधव रा. करंजी पोस्ट सरसम याचं महिन्याभरापूर्वी अपघाती निधन झालं. याची माहिती मिळताच बुलढाणा बैंकेच्या अधिकारी यांनी मयत सभासदाने घेतलेल्या सोने तारण कर्ज माफ करून वारसदारास तारण ठेवलेले सोने परत देण्यात आले आहे.


विविध उपक्रम राबविणारी बुलढाणा अर्बन शाखेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईजी यांनी सन 1986 ला बुलढाणा अर्बन संस्थेची स्थापना केली. स्थापनेपासून आदरणीय भाईजीनी फक्त बँकिंग न करता सामाजिक क्षेत्रात मध्ये बहुमूल्य योगदान दिले आहे. बुलढाणा अर्बन संस्थेचे नाव आशिया खंडात सर्वात मोठी पतसंस्था म्हणून आदराने घेतले जाते. बुलढाणा अर्बन नेहमी आपल्या सभासदांसाठी काहीतरी वेगळे उपक्रम राबवित त्याचा लाभ मिळवून देते. याची प्रचिती हिमायतनगर शाखेतून समोर आली आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बुलढाणा अर्बन शाखेचे सभासद विलास विनायक जाधव रा. करंजी पोस्ट सरसम याचं महिन्याभरापूर्वी अपघाती निधन झालं. सदरची माहिती शाखा व्यवस्थापक श्री.संजीव विश्राम वच्छाव यांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठाना कळविली आणि मयत सभासदाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर बुलढाणा अर्बन नांदेड जिल्ह्याचे विभागीय व्यवस्थापक माननीय श्री रोशनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मयत सभासद यांनी मागील काळात बैंकेत सोने तारण ठेऊन घेतलेले कर्जासाठी विमा मंजूर करून घेतला.


आज दि.०२ जानेवारी रोजी मयत सभासद सदर विलास विनायक जाधव यांच्या वारसदार पत्नी अंजली विलास जाधव यांना हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनूर यांच्या हस्ते कोणतेही पैसे न भरता बुलढाणा अर्बन बैंकेत तारण ठेवलेली सोन्याची वस्तू परत केली. या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, मंगरुळचे सरपंच जयस्वाल, श्री कुंडलकर सर, प्रा.कागणे सर, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, डीएसबी शाखेचे कुलकर्णी, अनिल नाईक, बुलडाणा अर्बनचे शाखा व्यवस्थापक श्री.संजीव विश्राम वच्छाव, शाखेचे कर्मचारी श्री.विवेक भगवान पांडे, श्री.अमोल पंडितराव वानखेडे, श्री. धनंजय सूर्यवंशी, श्री. दिगंबर कुऱ्हे, श्री.संदीप चव्हाण, श्री. चंद्रशेखर जेजेरवाड, शाखेचे ठेवीदार सभासद उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या सभासदांनी संस्थापक अध्यक्ष आदरणीय राधेश्याम चांडक भाईजी, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉ.सूकेशजी झंवर साहेब यांचे सदर उपक्रमाबद्दल मनापासून आभार मानले.
