नांदेड। लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षीण मतदार संघातील झरी सेवा सहकारी सोसायटीवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून झरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी युवक काँग्रेसचे नांदेड दक्षीण विधानसभा अध्यक्ष नितीन माधवराव पाटील झरीकर (गिरे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकतीच काही दिवसापूर्वी झरी येथील सेवा सहकारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक पार या निवडणुकीत काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ. अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षीणचे काँग्रेसचे आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे नांदेड दक्षीण विधानसभा अध्यक्ष नितीन माधवराव पाटील झरीकर (गिरे) यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनलने १३ पैकी १३ जागेवर दणदणीत विजय संपादन केला होता व आज दि.२ जानेवारी रोजी झरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची निवडणूक होती. यावेळी चेअरमनपदासाठी नितीन माधवराव गिरे झरीकर यांचे एकमेव नामांकनपत्र दाखल झाले असता पिठासीन जी.एस.चिल्ले यांनी नितीन माधवराव गिरे पाटील झरीकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
झरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी युवक काँग्रेसचे नांदेड दक्षीण विधानसभा अध्यक्ष नितीन माधवराव पाटील झरीकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,आ.मोहन अण्णा हंबर्डे, आ.अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर, राहुल हंबर्डे ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर,शहरअध्यक्ष विठ्ठल पावडे ,सचिन पाटील झरीकर, यांच्या सहीत झरी सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक गिरे आनंदा मारोती, गायकवाड नवनाथ गोविंद, गिरे एकनाथ बबन,गायकवाड मारोती गणेश, गिरे सचिन माधव,गिरे उत्तमराव देवराव, जाधव माधव सटवाजी, पैठणे बालाजी पुंडलिक, काळे काळबा बाबा, पांचाळ साहेब मारोती, गिरे सुमनबाई माधव, गिरे पार्वतीबाई पंडीत, पिठासिन अधिकारी जी.एस. चिल्ले,तेलंग यांच्या सहित सर्व गावकरी मंडळी, मित्रमंडळी यांनी केले.