Thursday, February 2, 2023
Home नांदेड नांदेड जिल्हा पोलीस विभाग सीसीटीएनएस कामगिरीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम -NNL

नांदेड जिल्हा पोलीस विभाग सीसीटीएनएस कामगिरीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कडुन पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस कामगिरी बाबतचा आढावा दर महा घेण्यात येतो राज्यातील सर्व घटकांचे माहे नोव्हेंबर -2022 मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्हयाने राज्यात ( 1 ) प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्हयातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे, आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम अनओळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ / बेवारस मालमत्ता, प्रतीबंधक कार्यवाही व ईतर नोंदी अश्या एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये नोंदी करण्यात येतात.

तसेच सीसीटीएनएस प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध, गुन्हे उघडकिस आणुन चांगली कामगिरी करण्यात आली तसेच ITSSO, ICJS व CRI-Mac पोर्टलाचा प्रभावीपणे वापर केल्याने माहे नोव्हेंबर- 2022 मध्ये नांदेड जिल्हयाने 342 गुणांपैकी 307 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी मा. अपर पोलीस अधीक्षक, नांदेड श्री अबिनाश कुमार व मा. अपर पोलीस अधिक्षक भोकर श्री डॉ. खंडेराय धरणे व त्यांची सीसीटीएनएस टीम पोउपनि/रहिम बशीर चौधरी, मपोउपनि/ प्रणीता राजाराम बाभळे, पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस अंमलदार माधव नारायण येईलवाड यांचे अथक परिश्रमामुळेच नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!