
नायगाव,रामप्रसाद चन्नावार। नायगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदावर सौ. मिनाताई सुरेश पाटील कल्याण यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदोत्सव करण्यात आला.

या निवडणुकीच्या वेळी सभागृहात निवडणुकनिर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी सचिन गिरी, मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर,कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव रामेश्वर बापुले, श्रीधर कोलमवार. सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थिती होती.

नायगांव नगर पंचायत सभागृहात एकुण १७ नगर सेवकांची संख्या असून सर्वच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे असून विरोधकांना खाते ही उघडता आले नसल्याने सभागृहात माजी आ.तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांची एक हाती सत्ता आहे.तात्कालिन नगराध्यक्षा सौ. गीता जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नुतन नगर अध्यक्ष पदावर सौ. मिनाताई कल्याण यांची निवड करण्यात आली.

या निवडीच्या वेळी माजी आ.वसंतराव चव्हाण,माधवराव बेळगे, बळवंतराव बेटमोगरेकर, केशवराव चव्हाण, कैलास गोरठेकर,हानमंतराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, संजय बेळगे ,सुरेश पाटील कल्याण ,प्रा.रविंद्र चव्हाण ,नगरसेवक दयानंद भालेराव, विजय भालेराव , सौ.सुमनबाई सोनकांबळे, सौ.ललीता भालेराव ,पंकज चव्हाण, सुभाष कल्याण,डाॅ शिवाजी कागडे , आदीची उपस्थिती होती.

