
नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय यांनी शास्ती माफी योजनेचा ३१ डिसेंबर २२ अखेराचा दिवशी एक कोटी ३८ लाख ५५९ रुपये ऐताहासिक विक्रमी वसुली केल्या बद्दल मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त डॉ रईसौधदीन कर निरीक्षक, वसुली लिपीक यांच्ये अभिनंदन केले आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम ,निलेश सुंकेवार उपायुक्त मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी व अजितपालसिंग संधू नगरसचिव, यांच्या मार्गदर्शक यांच्या आदेशानुसार झोन क्रमांक 6सिडको कार्यालय अंतर्गत सहाय्यक आयुक्त डॉ.शेख राईसोदिन यांच्या आधी अधिनस्त पथकाने या मालमत्ता क्रमांक 4051002009 यांच्याकडे वसुलीसाठी गेले असताना एकूण थकबाकी 10856518 इतकी येणे बाकी होते, मालमत्ता धारक यांनी ३१ डिसेंबर अखेर शास्ती माफी योजना च्या लाभघेऊन एकूण रुपये 47 लाख 07 हजार 380रूपये धनादेश व्दारे कर निरीक्षक सुधीर सिंह बैस, सुदाम थोरात ,वसुली लिपीक मारुती सारंग ,मालू एनफळे यांनी वसुली केली आहे.

तर कार्यालय मध्ये दोन प्रभागातील विविध मालमत्ता धारकाकडे असलेली रक्कम १ कोटी १७ लाख १९ हजार, धनादेश पोटी ८१ लाख ४६ हजार, ७९२,पाणीकर ६ लाख ४४ हजार ३०७, आँनलाईन वसुली ४० हजार ३६०,जनरल वसुली ३५ हजार २००व नगदी भरणा केली असून एकुण एकुण एक कोटी ३८ लाख ५५९ अशी विक्रमी वसुली केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वसुली साठी कार्यालय सहाय्यक आयुक्त डॉ रईसौधदीन, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,कर निरीक्षक सुधीर बैस, सुदाम थोरात व वसुली लिपीक हे परिश्रम घेत आहेत.

