
उस्माननगर ( मोठी लाठ ) ता.कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.रामकिशनराव मारोतराव वारकड गुरुजी यांना कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२२ या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वारकड गुरुजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख…….!

कंधार तालुक्यातील मौजे उस्माननगर ( मोठी लाठी) येथे सखुबाई आणि मारूती या दांपत्यापोटी रामकिशन वारकड गुरुजी यांचा जन्म २० / ७ /१९४४ ला शेतकरी कुटुंबात झाला. समाजात त्याकाळी शिक्षणाला फार महत्त्व देत नव्हते . १९५० साली सातवी पास झाले.त्याकाळी गावात दुकान होते. रामकिशन वारकड गुरुजी हे हुशार व स्वता: च्या पायावर उभे राहण्यासाठी आणि व्यापाराची माहीती घेऊन दुकान टाकवे व घराच्या शेतीकडे लक्ष द्यावे असी इच्छा वडिलांची होती. त्याकाळात सरकारी नौकरी लागने कमी होते.

ज्याना नोकऱ्या लागल्या त्यावेळेस पगारी खुपच कमी होत्या. त्यामुळे वडीलांला वाटतं होते की रामकिशन ने नोकरीच्या मागे न लागता शेतातच काम करावे , गुरुजींच्या मनात ठाम विश्वास घेऊन गावातील खेडकर ( काका) यांनी दुकानांची माहीती शिकवले.त्यावेळेस गुरुजींना पगार नव्हता.त्याकाळी गावात एकच दुकान असल्यामुळे गावातील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक हे पेन्सील, कार्बन,कागद , शाळेला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी दुकानावर येत असत. त्यावेळेस खेडकर काकांनी गुरुजींना आठवीत घेण्यासाठी विनंती करीत होते. दुकानावर काम करून शाळेचे पुस्तक वाही पेन खरेदी करून शाळा शिकली .जिद्द, चिकाटी, मेहणत करून आठवी ,नववी दहावी च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.

दहावीत असताना गुरुजींच्या वडिलांचे निधन झाले.मोठा आधार नाहीसा झाला.फार मोठी जबाबदारी पडली.शेतीकडे लक्ष द्यावे की ,नौकरी साठी हा प्रश्र्न सतावित होता.अचानक एके दिवशी गावातील ज्येष्ठ ( कै.) मधुकरराव गुरुजी भेटले व म्हणाले , नौकरी करण्याची इच्छा आहे का ? त्यावेळेस वेळ न लावता हो हे शब्द तोंडातून निघाले . १९६३ रोजी लोहा तालुक्यात नेमणूक झाली.धर्माबाद ,वानोळा ( ता.किनवट ) ,वाई , येवली पिंपळगाव ता.कंधार ,टेळकी ,शिराढोण , आणि मुख्याध्यापक म्हणून तेलंगवाडी ता.कंधार नेमणुक केली.३८ वर्ष शिक्षणसेवेतून सेवा करून ३०/७ /२००० ला सेवानिवृत्त झाले.

समाजाची असलेली तळमळ व ध्येय हे कार्य सर्वांना डोळ्यासमोर दिसते.गुरुजीनी शुन्यातून आपला प्रपंच उभा ठेवून समाजाला दिशा दिली.आज संसराचा सागर एकाच छताखाली एकत्रीत कुटुंबांना शिस्तीत ठेवून विविध क्षेत्रात मुल , नातवंडं समाजाची सेवा करतात . गुरुजी धार्मिक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढ येऊन भजन ,किर्तनातून सेवा करतात.दररोज शिवपाठ करतात ,कधीच अळस करीत नाहीत. सिध्देश्वर मंदिर येथे त्यांची पहिली उपस्थित दिसून येते.शिवभक्त त्यांचे स्वर ऐकण्यासाठी हजर होतात.मागील कोरोनाच्या काळात त्यांची तब्येत खालावली होती.

मुलांच्या नातू पणतू यांच्या अथांग परिश्रमातून व गुरू कृपाच्या आशिर्वादाने त्यांची प्रकृती छान झाली.आज आनंदाने परिवारात हसत खेळत राहतात. त्यांच्या सौभाग्यवती यांची नेहमी साथ राहीलेली आहे.वारकड गुरूजी यांचा मुलगा, नातू शेतीकडे लक्ष देतात.तर दुसरा मुलगा ग्रामपंचायत सदस्य असून सामाजिक कार्यात सहभागी आहे.नातवंड दवाखान्यात राहून सेवा करतात.घरी एकूण २० जनांचा परिवार आहे. रामकिशन वारकड गुरुजी यांनी तन,मन लावून बरंच काही कमावलं आहे.

गुरुजींना कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२२ या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होत आहे.त्यांचे पुढील जीवन सुखकारक जावे , यासाठी ईश्र्वर चरणी प्रार्थना करतो.व पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा देऊया….
…माणिक भिसे उस्माननगर
