मुंबई| सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय असणारी उर्फी जावेद हिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी (जावेदवर) तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तिचा असाच एक व्हिडिओ शेअर करत वाघ यांनी ‘मुंबईच्या रस्त्यांवर हे काय चाललंय?’ असा सवाल केला होता. आता त्यांनी याप्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केल्याचा उल्लेख केला आहे.
मुंबई च्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी
मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली @MumbaiPolice @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/M3HHpvTyMB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 1, 2023
चित्रा वाघ यांनी तक्रार केलेले परिपत्रक ट्विटरवर शेअर केले असून, त्या पत्रकात म्हटले आहे कि,उफी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाच कलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही, मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.
तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे.