
नविन नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बध्दल हे धर्मवीर नव्हते असे अपशब्द काढल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या नेतृत्वाखाली दि.२ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता हडको छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध व्यक्त करण्यात आला.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अशी वाचाळ वक्तव्य केल्याचा जाहीर निषेध भाजयुमो शहर नांदेड चा वतीने ठिक ठिकाणी निषेध आंदोलन दि.२ जानेवारी रोजी करण्यात आली. त्या अनुषंगाने सिडको परिसरातील हडको भागात हि निषेध आंदोलन करण्यात आली .

यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले, राज यादव,सुनिल चाकुरकर, गजानन शिंदे,किरण कापसीकर, सोनु जोशी,विजय गंभीरे, बाळू खोमणे,सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख ,गजानन कत्ते,मोनु जोशी, भुजंग मोरे ,संतोष गुट्टे, नितीन देशमुख, संदीप पावडे , संदीप पाटील, सुनील भालेराव , राजन झोजारे, आशिष ठाकूर यांच्या सह भाजपा व भाजयुमो पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते. या वेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी संभाजी महाराज यांच्या बदल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येऊन शहरातील विविध भागात निषेध आंदोलन केले असल्याचे सांगितले.

