
उस्माननगर। माणिक भिसे। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बळीराम पाटील प्राथमिक शाळा, भोपाळवाडी ता.लोहा येथील शाळेच्या वतीने विविध धार्मिक क्षेत्राचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी मुख्याध्यापक यांनी सहल आयोजित करण्यात आली.त्या सहलीचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.

शाळेची सन 2022 2023 शैक्षणिक – सहल दिनांक 28/12/2022 वार-बुधवार रोजी पहाटे ठिक 6:00 वाजता श्रीक्षेत्र माहुर येथे नेण्यात आली होती. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी माहुर येथील किल्ल्यांची पाहणी करून रेणुका माता, अनुसया माता व दत्तात्रय मंदिर या तिनंही देवतांचे दर्शन घेऊन मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. तसेच परत येताना उमरखेड येथे विद्यार्थ्यांसाठी राजश्रीताई कंधारे यांची जिवलग मैत्रीण जि.प.प्रा. शाळा, मुळावा च्या मुख्याध्यापिका शाहू केंद्रे मॅडम यांनी आपल्या मैत्रीणीची शाळेसह खुप दिवसांनी सलग 20 वर्षांनंतर भेट झाली याचा आनंद साजरा करत सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आपल्या आईस्क्रीमची व बदामशेक ची मेजवानी दिली.

त्यानंतर सत्यगणपती मंदीराचे दर्शन घेऊन रात्रीचे भोजन करून रात्री ठिक 10:00 वाजता भोपाळवाडी गावात सुखरुप पोहोचलो. अशा प्रकारे अगदी उत्साही वातावरणात शाळेची सहल संपन्न झाली. या सहलीत इयत्ता 1 ते 4 थी चे मुले – 14 मुली-18 असे एकुण 32 विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक माधव भोपाळे, राजश्रीताई कंधारे, राहुल टोम्पे इत्यादी शिक्षक मंडळी व सुनिता कौंसे मावशी सहलीत सहभागी होऊन विद्यार्थ्यांची मनोभावे परिश्रम घेतले.

