
उस्माननगर। येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक शि.भ.प. रामकिशन मारोतराव वारकड गुरुजी यांना कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२२ या वर्षाचा जीवन गौरव पुरस्काराचे वितरण दि.३ जानेवारी मंगळवारी रोजी होणार आहे.

कै.नागोराव गणपतराव पांडे लाठकर वैद्यकीय ट्रस्ट, नांदेड व समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

समता विद्यालय उस्माननगर येथे दि.३ जानेवारी मंगळवारी सकाळी कै. नागोराव गणपतराव पांडे लाठकर व कै.आनंदीबाई नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू लाभार्थ्यांना, रुग्णांना आर्थिक सहाय्यक तसेच कै.भास्कर नागोराव पांडे-लाठकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवन गौरव पुरस्कार २०२२ या वर्षाचा जीवन गौरव पुरस्कार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा वीरशैव समाजातील ज्येष्ठ नागरिक श्री. रामकिशन मारोतराव वारकड गुरुजी यांना माजी मुख्याध्यापक श्री. श्यामसुंदरराव जहागीरदार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.तरी परिसरातील मित्र मंडळ व पाहूणे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे संयोजक यांनी कळविले आहे

