
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व त्याचबरोबर , जीवनमूल्य रुजवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शैक्षणिक वर्षात अभ्यास पूरक कार्यक्रम म्हणून लिटल स्टेप इंग्लिश स्कूल ची शैक्षणिक सहल विविध ऐतिहासिक स्थळे, पौराणिक वास्तु, प्राचीन व आधुनिक मंदिरे, प्राणी संग्रहालय तसेच वॉटर पार्क अशा विविध ठिकाणी भेट देऊन संपन्न झाली.

दोन टप्प्यात पार पडलेल्या या शैक्षणिक सहली दरम्यान प्रथमतः वेरूळ अजिंठा, दौलताबाद किल्ला. शिर्डी, औंढा नागनाथ तसेच घृष्णेश्वर मंदिर या ठिकाणी ,भेटी देण्यात , आल्या.यादरम्यान विद्यार्थ्यांनी दौलताबादचा किल्ला, बीबी का मकबरा, ऐतिहासिक पानचक्की,साई तीर्थ या ठिकाणी भेटी दिल्या . दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी चाकूर या ठिकाणी असलेल्या वृंदावन उद्यान त्याचबरोबर वॉटर पार्क आणि एडवेंचर पार्क या ठिकाणी भेटी दिल्या.

या दोन्ही सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सहलींचा आनंद घेतला आणि सर्व पालकांनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या पाल्यांना सहभागी करून त्यांना विविध ठिकाणांना भेट देण्याचा आनंद मिळवून दिला. सहलीच्या यशस्वीतेसाठी लिटिल स्टेप येथील बालाजी शिंदे, श्री गजानन कोलमवार,श्री एच टी जाधव, प्रियंका जाधव तसेच संपूर्ण स्टाॅफ नी मेहनत घेतली.

